Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा

By vedu Jan 13, 2025
Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छाMakar Sankranti Wishes In Marathi 2025 | मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा

Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा

Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे आपले खास महत्त्व आहे. परंतु, वर्षाच्या सुरुवातीलाच साजरा होणारा मकर संक्रांत हा सण अधिक खास मानला जातो. हा सण धार्मिकता आणि पवित्रतेचा सुंदर संगम आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच या सणाला ‘मकर संक्रांत’ असे म्हणतात. या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, तसेच तिळगुळाचे लाडू वाटून एकमेकांना गोड गोड शुभेच्छा दिल्या जातात. यंदा १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.

या खास निमित्ताने तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना गोड शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. मकर संक्रांतीच्या शुभेच्छांसाठी प्रत्यक्ष भेट होणे शक्य नसले, तरी ऑनलाइन शुभेच्छा पाठवून गोडवा कायम राखता येईल. चला तर मग, मकर संक्रांतीच्या गोड आणि हटके मराठमोळ्या शुभेच्छा पाहूया!

मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Makar Sankrati Wishes In Marathi 2025

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!


गूळ आणि तीळाचा गोडवा,
आकाशात उडणारे उंच उंच पतंग,
या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग…
हॅपी मकर संक्रांत!


काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास
आपली नाती जपू हा ठेवा ध्यास,
पूजा करूया नी रचूया सुगडाची रास
एकमेकांवर ठेऊनी विश्वास,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.


गोड नाती गोड सण
तुम्हाला मिळो खूप धन
आनंद, ऐश्वर्य, सुख, समृद्धी
राहो तुमच्या अंगणी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!


कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा.


पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो.
यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो, हीच सदिच्छा.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!


छोट्यांचे बोरन्हाण,
मोठ्यांची पतंगबाजी
सुवासिनींचे हळदीकुंकू,
सर्व घेऊन आला मकरसंक्रांतीचा उत्साह,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


म… मराठमोळा सण
क… कणखर बाणा
र… रंगीबिरंगी तिळगुळ
सं… संगीतमय वातावरण
क्रा… क्रांतीची मशाल
त… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमचे आयुष्य पावेली सूर्याच्या किरणांप्रमाणेच,
सुखाने आणि भरभराटीने भरून जावी,
मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


“तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाहु,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर सक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।


तिळाची उब लाभी तुम्हाला,
गुळाचा मोहवा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड्डी गगना वरती,
तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबाला,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास,
नाती जपू हाय ठेवा ध्यास,
पूजा करूया नी रच्या सुगडाची रास,
एकमेकांवर ठेऊनी विश्वास!
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा।


नवीन वर्षाचा पहिला सण,
“मकर संक्रातीच्या” सर्वांना
गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोलाएं


दिवस-रात्र, वर्ष-महिने, सुख-दुःख सर्व काही बदलतील,
बदलत नाही ती फक्त माणसा-माणसांतील
अनमोल नाती तीच जापुया तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या पतमाचा,
बंध दाटत्या नात्यांचा मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !


दुख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा,
स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा,
अर्पिला तुम्हाला हलवा, गौड करून घ्यावा,
गोड गोड शब्दासंगै स्नेहभाव द्यावा,
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Makar sankranti caption in marathi | मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा For WhatsApp 2025

विसरुनी जा दु:ख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


तीळ आणि गुळासारखी राहावी
आपली मैत्री घट्ट अन् मधुर
नात्यातील कटुता इथेच संपवा
तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला!


एक तिळ रुसला, फुगला,
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खुदकन हसला, हातावर येताच बोलू लागला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!


तिळाची गोडी, प्रेमाची माडी,
माडीचा जिना, प्रेमाच्या खुणा, मायेचा पान्हा,
साऱ्यांच्या मना, म्हणूनच एक तीळ सात जना,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!


वर्ष सरले, डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या संदेशरूपी गोड गोड शुभेच्छा!

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *