उखाणे ही मराठी संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य परंपरा आहे. लग्नसमारंभात वधू-वर किंवा त्यांच्या नातेवाईकांना उखाणे घेण्यास सांगितले जाते. उखाणे हे चार ओळींच्या काव्यात्मक स्वरूपात असतात, ज्यात वधू किंवा वराच्या गुणांचे कौतुक केले जाते. हे उखाणे साधारणपणे विनोदी किंवा सूचक असतात, त्यामुळे ते समारंभात उत्साह आणि आनंदाची भर घालतात.
उखाणे ही मराठी संस्कृतीचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे, जे आपल्या भाषेची सौंदर्यपूर्णता आणि समृद्धी दर्शवतात. ते केवळ विनोदाची नाही तर कल्पनाशक्तीचीही कसोटी पाहतात, म्हणूनच ते आपल्या परंपरेत महत्त्वाचे स्थान राखतात.
Marathi ukhane male मराठी उखाणे नवरदेवासाठी
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण,
…. चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
…..झाली आज माझी गृहमंत्री.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
… च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ,
…..शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
प्रेमाच्या राणात, नाचतो मोर,
…..शी केल लग्न, नशीब माझ थोर.
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
…चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
…च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
…च्या साथीने आदर्श संसार करीन.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल
..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा,
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
Marathi ukhane for female मराठी उखाणे नवरी साठी
नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी
(नाव पतीचे) पाटलांचे नाव घेते मी आले सासरी
संध्याच्या परीवर नागाची खून
(नाव) रावांचे नाव घेते जगदाळे यांची सून
अंगडी होती उमर उमरी ला आला बार
पाटलांनी माझ्यासाठी साडी घेतली हिरवी हिरवी गार
उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली
राजेंद्र रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
लाल मणी तोडले काळे मणी जोडले
गणेश रावांसाठी आई-वडील सोडले
हिरव्या साडीला कात आहे जतारी
(नाव) रावाचे नाव घेते शालू नेसून भारी
मंगळसूत्राच्या दोन वाटी सासू आणि माहेर
(नाव) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
चांदीच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडून बाकी सगळे वेडे
सूर्य चंद्र तारे आकाशाचे सोबती
गणेश राव आहे माझे साता जन्माचे सोबती
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
गणेश नावाचे रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास
गणेश रावांना भरवते पेढ्याचा घास
नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी
गणेश रावाचे नाव होते ओठावरती पण थांबले उखाण्या साठी.
नवीन उखाणे Ukhane For Female in Marathi Funny Marathi Ukhane
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
कुठून अवदसा सुचली म्हणून झाली यांची सून
चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा
लग्न झालं की बोंबलत बसा
चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी
गणेश रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी
ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल,
रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
हंड्यावर हंडे सात हंडे
कोरोनाला हरवायला बसा आपल्या घरात
मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी
गणेश रावांचे नाव घेते जय पब्जी
गुलाबाचे फुल दिसायला ताजे
रावांचे नाव घेते सौभाग्य माझे
अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड
गणेश राव तिळगुळ सारखे गोडगोड
दारी होती तुळस तुळशीला घातलं पाणी
आधी होती आई बाबाची तानी, आता झाली विलास रावची राणी
खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ
सगळीकडे जाऊ या लोकडॉन नंतर भेट.