Happy Birthday Wishes For Friend In Marathi 2024 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

By vedu Mar 2, 2024
Happy Birthday Wishes For Friend In Marathi

जर तुमच्या जिवलग मित्राला व मैत्रिणीचा वाढदिवस जवळ येत असेल आणि तुम्ही त्याला/तिला खास संदेश देऊन शुभेच्छा देऊ इच्छित असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, ते तुमच्या जिवलग मित्राला नक्कीच पाठवा.

चांगले आणि खरे मित्र नशिबाने मिळतात. हे एक नाते आहे जे आपण निवडतो. आम्ही मित्रांसोबत खूप वेळ घालवतो, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो. जर तुमच्या जवळच्या मित्रांपैकी कोणाचा वाढदिवस येत असेल आणि तुम्हाला काही खास मेसेजद्वारे तिला/तिला खास बनवायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday!.


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
Happy Birthday.


आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो,
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना,
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


जगातले सर्व सुख तुला मिळावे,
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


वर्षाचे ३६५ दिवस..
महिन्याचे ३० दिवस..
हफ्त्याचे ७ दिवस..
आणि माझ्या आवडीचा १ दिवस..
तो म्हणजे तुझा ‎वाढदिवस.
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!


प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


जे जे हवे तुला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुज्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तु करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Wish you Happy Birthday.


झेप अशी घ्या की पाहण्याऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला
की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की समुद्र अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत राहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही
चोहिकडे पसरवावा हिच शिवचरणी प्रार्थना.
आई भवानी आपणांस उदंड आयुष्य देवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday.


या जन्मदिनी तुझी सारी स्वप्नं साकार होवो.
तुला दीर्घआयुष्य लाभो सुख, समृद्धी मिळो,
आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल
आठवण ठरावा आणि त्या आठवणीने
तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा…
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!.
Happy Birthday.


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.
Wish you a very Happy Birthday.


बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
Happy Birthday.


Birthday Wishes in Marathi

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.
Happy Birthday.


शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे
तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा
सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे
तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा
सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Wish you Happy Birthday!.


आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पुन्हा पुन्हा तुमचा
जन्मदिवस यावा
पुन्हा नव्या वाटेवरून
नवा प्रवास व्हावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पुन्हा अनुभवावे तुम्ही
आनंदाचे नवे पर्व
आणि तुमच्या आनंदाचे
कारण असावे आम्ही सर्व.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आनंद तुमच्या जीवनातून
कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यातून
कधीही वाहू नये
तुमच्या जन्मदिनी या
आनंदाचा प्रहर यावा
तुमच्या व्यक्तिमत्वाला असाच
कर्तृत्वाचा बहर यावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


तुझ्या जीवनात यशाचा दिवा
असाच नेहमी तेवत राहो
तुझी सारी माणसं तुला
सदैव सुखात ठेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday!


आई तुळजा भवानी तुला संघर्षाचे बळ देवो
छत्रपतींच्या स्वराज्यासारखं पराक्रमाला फळ देवो
तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्याभल्यांची मती
काळाने ही गावी तुझ्या कर्तुत्वाची महती.
तुझ्या जन्मदिनी याच शिव शुभेच्छा!
Happy Birthday!.


तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे रंग सात
प्रिय जणांचा नेहमीच तुमच्या हाती असावा हात
जगण्यातील साऱ्या संकटावर तुम्ही करावी मात
तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडको उंच उंच गगनात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday!


रक्ताच्या नात्यापलीकडे
एक मैत्रीचं नातं असतं
सुंदर जसं वाऱ्यावर
डोलणारं गवताचं पातं असतं
प्रिय मित्राच्या जन्मदिनी
याच मनातल्या सदिच्छा
लाख मोलाच्या मित्राला
लाख भर शुभेच्छा!.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आयुष्यात बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षता न राहणारे आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात
त्यातलेच तुम्ही एक आहात.
वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday!


तुमच्या आयुष्याची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या
आयुष्यात आपणास हवे ते मिळो.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
सोन पिवळ्या उन्हा मधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचत राहा,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
असाच बहरत राहा
असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही
हार असो वा जीत हर्ष असुदेत सदैव मनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


लाभो संग सज्जनांचा जीवनी तुमच्या,
अन् आशीर्वाद मिळो वाडवडिलांचे,
हितचिंतकांची अशीच गर्दी भोवती जमावी.
हेच सार आमच्या या शुभेच्छांचे..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday!


शुभ क्षणांची ही वेळ न्यारी,
मांगल्य नांदते आज तुम्हा घरी,
स्वीकार व्हावा शुभेच्छांचा आमुच्या,
मनोमन दाटते इच्छा आज ही खरी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


उजळून निघावा यश कीर्ती ने चेहरा तुमचा
अन् त्यावर समाधानाची लाली चढावी,
परोपकारी वृत्ती मनी दाटून,
हातून जगत कल्याणाची कार्ये घडावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं,
अन् सुख शांतीने सजवावं,
अडचणींचे डोंगर पार करून,
यश शिखरावर तुम्ही पोहचावं.
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे प्रार्थना आहे की,
आयुष्यात तुला वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi

तुझा वाढदिवस तुझ्यासाठी
खूप आनंद, उत्तम आरोग्य
यशाच्या दिशेकडे वाटचाल
आणि खूप समृद्धी घेऊन येवो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday.


तुमच्या वाढदिवसाने झालाय संपूर्ण कुटूंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे आयुष्य असो हजारो वर्ष.
त्या दिवसाचा प्रत्येक क्षण असो खास
तुम्हा सुख शांती मिळत राहो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
यश आणि कीर्ती वाढत जावो,
सुख समृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday !.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *