Chhatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi

By vedu Feb 8, 2024
chhatrapati shivaji maharaj essay in marathi

chhatrapati shivaji maharaj essay in marathi आज आपण थोर पुरुषाचा निबंध पाहणार आहोत आणि ज्ञानियांचा राजा म्हणजे संत ज्ञानेश्वर, साने गुरुजी एक आदर्श

युगपुरुष – छत्रपती श्रीशिवाजी महाराज chhatrapati shivaji maharaj essay in marathi

‘झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा।’ हे वर्णन ज्यांना चपखल लागू पडते ते म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज! म्हणूनच आज तीनशे वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान अढळ आहे. छत्रपती शिवाजीराजांचे राजा आणि व्यक्ती म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चारित्र्य अत्युच्च होते, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वांच्या तोफा कालशिरावर अखंड झडतच राहतात.

शिवरायांचा जन्म १६३० मध्ये झाला. १६८० साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य. पण या अल्प काळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे. या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या अजोड कर्तृत्वात आणि महान चारित्र्यातच दडलेले आहे.

शिवनेरी किल्ल्यावर शहाजी भोसले व जिजाबाई यांच्या या सुपुत्राचो जन्म झाला. शिवरायांना पित्याचा सहवास अपुराच मिळाला. पण त्यांच्या कर्तबगार, शूर मातेने या आपल्या असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिश्रमपूर्वक घडवले. शिवाजीराजांचे आजोबा मालोजी व पिता शहाजी हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला. शिवाजीराजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजवले आणि त्याचा वेलू वाढवला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली. या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले; पण राजांनी कधी माघार घेतली नाही, आदिलशाही, निजाम यांच्याबरोबरच काही वेळेला स्वकीयांचाही विरोध सहन करावा लागला, कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. ६ जून १६७४ रोजी हा शूर और राजसिंहासनावर बसला, पर ‘ही तो श्रींची इच्छा’ अशी त्यांची विचारसरणी होती. हे’ जनतेचे राज्य’ आहे, असेच ते मानत भार‌तातील लोककल्याणकारी राज्याची पहिली कल्पना येथे साकार झाली.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला. त्याचबरोबर राज्यकारभारविषयक एक सुसूत्र नियमावली तयार केली. अष्टप्रधानांची नियुक्ती केली, त्यांच्या मार्गदर्शनास ‘राजव्यवहारकोश’ तयार करून घेतला. राज्याभिषेकानिमित्त ‘ होन’ आणि ‘शिवराई’ ही दोन नवी नाणी व्यवहारात आणली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृतात आहे. राजांनी स्वराज्याचे मानचिन्ह म्हणून भगव्या ध्वजाची निर्मिती केली.

आपल्या राज्याचा कारभार कसा चालावा, याबद्दल महाराजांनी काटेकोर नियम केले होते. राज्याचा कारभार जनताभिमुख ठेवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे, असे महाराजांचे आदेश होते. शिवरायांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे ते आपल्या प्रजेला सर्वांत श्रेष्ठ मानत आणि सेना व शासनकर्ते यांच्याकडून प्रजेला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत. म्हणूनच लोकांना हा जाणता राजा आपला खराखुरा राजा – लोकांचा राजा वाटतो.

साने गुरुजी – एक आदर्श किंवा माझा आदर्श – साने गुरुजी Sane Guruji Essay in Marathi

मी पाचवीत असताना साने गुरुजींची ‘सुंदर पत्रे’ वाचली. एका पत्रात सुधाला धर्माची कल्पना समजावून देताना गुरुजी लिहितात, ” आपण पोस्टकार्ड लिहितो. त्यावर स्वच्छ, सुंदर अक्षर्यंत पूर्ण पत्ता लिहिला तर आपण पोस्टमनबाबतचा धर्म पाळला, असे होईल.” धर्माची इतकी सोपी, सुंदर कल्पना माझ्या मनावर कायमची उसली. गुरुजींच्या जीवनातून मिळालेला हा एक अनमोल आदर्श आहे. कोणतेही काम करताना प्रथम दुसऱ्याचा विचार करा, हे त्यांचे म्हणणे होते. साने गुरुजींनी अगदी छोट्या छोट्या वाक्यांतून महान सत्य मुलांना सांगितले-‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।’ गुरुजी किती सोप्या शब्दांत धर्माची कल्पना मांडतात ! गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते.

साने गुरुजीचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. १८९९ साली त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्हयातील पालगड येथे झाला. त्यांचे बालपण कोकणात गेले. त्यांच्या साहित्यात कोकणातील हिरवेपणा व आंब्यातील मधुरता भरून राहिली आहे.

गुरुजींनी मुलांसाठी भरपूर लेखन केले; कारण-

‘करील जो मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे.’

अशी त्यांची भावना होती. ‘गोड गोष्टी’ (दहा खंड), ‘धडपडणारी मुले’, ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ (सहा खंड), ‘तीन मुले’ असे उत्कृष्ट बालसाहित्य गुरुजींनी निर्माण केले. मुलांना कथा सांगून रंगवून टाकायचे ही तर गुरुजींची खासियत होती. त्यांचाच आदर्श ठेवून अनेक मंडळांनी ठिकठिकाणी ‘साने गुरुजी कथामाला’ सुरू केल्या.

गुरुजींच्या बालमनावर त्यांच्या आईने सुसंस्कार केले होते. आईला ते सर्वस्व मानत. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात ते सांगतात, “माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. बघायला, प्रेमळपणे बोलायला तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे; तर गाईगुरांवर, फुलपाखरांवर व झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच शिकवले.” साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा उल्लेख आचार्य अत्रे, ‘मातृप्रेमाचा महान मंगल स्रोत’ असा करतात, तर “श्यामची आई हे एक वाचनीय पुस्तक नसून ते एक अनुभवण्याचे पुस्तक आहे,” असे कविवर्य वसंत बापट सांगतात. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारलेल्या आचार्य अत्रे निर्मित चित्रपटाला ‘राष्ट्रीय सुवर्णकमळ’ हे पारितोषिक मिळण्याचा पहिला मान मिळाला होता.

गुरुजीना भारतीय संस्कृतीविषयी विशेष आदर होता. या संस्कृतीची वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकात सर्वांसाठी सहज टिपली आहेत. भारतातील अनेक भाषांविषयी गुरुजींना विशेष आकर्षण होते. विविध भाषांचा अभ्यास व्हावा आणि त्यानिमित्ताने सर्व भारतीय अंत:करणाने एकमेकांच्या जवळ यावेत म्हणून त्यांनी ‘आंतरभारती चळवळ’ सुरू केली.

गुरुजी हे स्वातंत्र्यलढ्यातील एक सैनिक होते. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत ते भूमिगत होऊन कार्य करत होते. नंतर त्यांनी तुरुंगवासही सोसला. साने गुरुजींची समाजविषयक जाणीवही सखोल होती. त्यांना जातिभेद, धर्मभेद बिलकूल मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी पंढरपूरच्या देवळात जातिपातींच्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले आणि प्रवेश मिळवून दिला.

आपल्या भोवतालचे हिंसक, अविचारी जीवन साने गुरुजींच्या प्रेमळ मनाला सहन झाले नाही, तेव्हा मध्ये त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गुरुजी देहाने गेले; पण त्यांची पुस्तके, त्यांचे लेखन आजही आपल्यापुढे उच्च, उदात्त आदर्श ठेवते.

ज्ञानियांचा राजा – संत ज्ञानेश्वर Sant dnyaneshwar Essay in marathi

जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।

एवढा मोठा ग्रंथयज्ञ केल्यावर त्या ज्ञानियाच्या राजाने संत ज्ञानदेवाने जे पसायदार मागितले, त्यांत स्वत:साठी काहीही मागितले नाही; तर या जगातील प्राणिमात्रांना जे जे काही हवे असेल ते ते त्यांना मिळो, हे मागणे विश्वात्मक देवाकडे केले. केवढं मोठं मन ! आणि हेसुद्धा वयाची विशी ओलांडण्यापूर्वीच !

संत ज्ञानेश्वरांचे आचारविचार हे सर्व काही जगावेगळे होते. त्यांच्या वाट्याला आलेली दुःखे, त्यांच्या वाट्याला आलेला ताप एवढा भयंकर की, हा विरक्त वृत्तीचा योगी पुरुषही एकदा जगाला कंटाळला आणि त्याने स्वतःला कोंडून घेतले. ‘नको हे स्वार्थी जग!’ असे त्यांच्या मनात आले. त्यावेळी संत ज्ञानदेवांच्या चिमुरड्या बहिणीने त्यांना बोध केला – ‘विश्व जाहलिया वन्ही। व्हावें पाणी।’

संत ज्ञानेश्वरादी भावंडांत तत्कालीन कर्मठ समाजाकडून छळ का सहन करावा लागला? तर ती संन्याशाची मुले होती. आधी संन्यास घेतल्यावर गुरुर्जीच्या सांगण्यावरून संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठलपंतांनी पुन्हा संसाराचा स्वीकार केला व त्यानंतर या चार मुलांचा जन्म झाला. संत ज्ञानदेवांचा जन्म शके १९९७ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीस झाला होता. संन्यास घेतल्यावर पुन्हा संसार केल्याबद्दल संत ज्ञानदेवांच्या आईवडिलांना कर्मठ समाजाने देहान्त प्रायश्चित्ताचीही शिक्षा ठोठावली. त्यामुळे बालवयात ही चार भावंडे पोरकी झाली.

अशा समाजात संत ज्ञानदेवांनी आपल्या कर्तृत्वाने असे स्थान मिळवले की, संत ज्ञानदेव ही त्यांना आपली माउली वाटू लागली. समाजातील दुष्टावा नष्ट करण्यासाठी संत ज्ञानदेवांनी ‘भागवत धर्माच्या’ छताखाली सर्व समाजाला एकत्र आणले. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, हे लोकांच्या मनात ठसवून, त्यांनी लोकांना ‘ नामस्मरण’ हा देवभक्तीचा सोपा मार्ग दाखवला. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या वारीत सर्व धर्मजातीचे लोक एकत्र आले. सर्वांना घेऊन ते पंढरपुरास गेले.

“माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेइन गुढी ।। पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।”

अशा आतं शब्दांनी त्यांनी आपले मनोगत, आपली तळमळ बोलून दाखवली आहे. संस्कृतात असलेली गौता स्त्रीशुद्रादिकांना अप्राप्य होती. म्हणून संत ज्ञानदेवांनी तो मराठीत आणली. आपल्या समोरच्या समाजाला गीतेचा भावार्थ समजावून सांगण्यासाठी संत ज्ञानदेवांनी ‘भावार्थदीपिका’ सांगितली. मराठी भाषेविषयी संत ज्ञानदेवांच्या मनात मोठा आदर होता.

ज्ञानेश्वरीतील शब्दाशब्दांतून संत ज्ञानदेवाचा विनय व्यक्त होतो. ज्ञानेश्वरीनंतर त्यांनी आठशे ओव्यांचा ‘अमृतानुभव’ हा स्वतंत्र ग्रंथ लिहिला. वयोवृद्ध, तपोवृद्ध योगिराज चांगदेव यांच्या कोन्या पत्राला उत्तर म्हणून ‘चांगदेव पासष्ठी’ हा ६५ ओव्यांचा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी रचला. याशिवाय आपल्या भोवतालच्या सामान्य जनासाठी हजारो अभंग रचले.

संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माचे जे इवलेसे रोप लावले, ते महाराष्ट्रभर पसरले आहे. त्याचे वर्णन करताना संत ज्ञानदेव म्हणतात,

“इवलेसे रोप । लावियेले द्वारी। त्याचा वेलु गेला गगनावरी ।। मोगरा फुलला, मोगरा फुलला। फुले वेचिता बहरू कळियासि आला ।। “

अशा संत ज्ञानदेवांनी आपले कार्य संपले असे मानून शके १२१८ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली.

एक समाजसेवक संत – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज Sant Tukdoji Maharaj Essay Im Marathi

‘प्रयत्ले मानव होई उन्नत। गावचि नव्हे, हालवी दिक्प्रांत।’ असा प्रयत्लार महिमा वर्णन करणारे संत तुकडोजी महाराज हे विदर्भातील यावली गावचे सुपुत्र. त्यांचा जर १९९९ मध्ये झाला. त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने त्यांच्या घरू विठ्ठलभक्ती, ज्ञानेश्वर-तुकाराम भक्तीदेखील रुजली होती. तुकडोजींचे नाव माणिक बंडोई ठाकूर, यो माणिकने तिसरीतच शाळा सोडून दिली आणि तो ध्यान, भजन-पूजन यांत रंगून गेला तो नेहमी तुकोबाचे अभंग म्हणत असे. एकदा हा माणिक आपल्या आजोळी गेला असताना त्याचे गुरू आडकुजी महाराज त्याला म्हणाले, ”तुका म्हणे’ असे कित्ती दिवस म्हणशील। ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा.” तेव्हापासून गुरुजींच्या आज्ञेनुसार माणिक ‘तुकड्य म्हणे’ या नाम-पदाने संपणारे अभंग रचू लागला. लोक त्याला ‘तुकडोजी महाराज’ म्हणून ओळखू लागले.

पुढे तुकडोजी महाराजांनी विपुल रचना केली. त्यांची चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले ‘ग्रामगीता’ हे काव्य त्यांनी रचले. ते हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना करत. ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इत्यादी विषयांवर ते कीर्तन करत गावोगाव हिंडत. आपल्या कीर्तनात ते स्वरचित गीते खंजिरीच्या साथीवर म्हणत असत. लोकांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून गौरवले.

आपले कीर्तन, आपली खंजिरी यांचा उपयोग तुकडोजी महाराजांनी समाजसेवेसाठी केला. समाजात. परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, जाति-धर्म-पंथभेद, अंधश्रद्धा या गोष्टींवर संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने घणाघाती हल्ला केला. ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांपुढे ठेवले. त्यामुळे सर्व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी झाले. लौकिक जीवन चांगल्या तन्हेने जगावे, असे त्यांचे सांगणे असे. म्हणून आपल्या कीर्तनातून ते व्यायामाचा प्रचार करत.

१९३० साली तुकडोजी महाराजांचा महात्मा गांधीजींशी संपर्क आला त्यांनी राष्ट्रकार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला, स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला भूदान.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *