Marathi Niband For School 2024

By vedu Feb 5, 2024
Marathi Niband For School 2024

कल्पनात्मक निबंध

अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाल्यास काय घडेल या कल्पनेच मुक्त वापर करून लिहिलेल्या निबंधाला ‘कल्पनाविलासात्मक निबंध’ म्हणतात. आधुनिक जीवनव्यवहारात काही वस्तू अगदी अपरिहार्य झाल्या आहेत. त्या उपलब्ध नसल्यास काय घडेल, याचे वर्णन कल्पनाप्रधान निबंधात करता येते. परंतु त्याच वेळी त्या वस्तूंची आवश्यकता किती आहे, त्यामुळे आपल्या जीवनात किती सौंदर्य तसेच कृत्रिमताही निर्माण झाली आहे, हेही सांगता आले पाहिजे.

वर्तमानपत्रे बंद झाली तर…

एखादया दिवशी वर्तमानपत्रे प्रकाशित झाली नाहीत, तर सर्वांना चुकल्याचुकल्या सारखे होते. घरातला प्रत्येकजण एक दुसऱ्याला विचारतो, ” अरे, आज पेपर आला नाही का?” वर्तमानपत्र मिळाले नाही, तर काहीतरी बिघडल्यासारखे होते. इतके वर्तमानपत्राचे महत्त्व आज प्रत्येकाच्या जीवनात निर्माण झाले आहे, खरे पाहता, आज चोवीस तास बातम्या देणाऱ्या दूरदर्शनच्या अनेक वाहिन्या आहेत आणि बहुतेकजण दूरचित्रवाणी पाहत असतात. नभोवाणीवरील बातम्या ऐकत असतात. तरीपण वर्तमानपत्राची ओढ नाहीशी झालेली नाही.
अशी ही वर्तमानपत्रे बंद झाली तर… तर सकाळच्या चहाची लज्जत कमी होते. चहा बेतालाब नाही असे वाटते किंवा चहा पिऊच नये असे वाटू लागते. माहीत असलेली बातमी- आणि त्यावर वृत्तपत्रकाराने केलेली मल्लिनाथी स्वतः वाचावी अशी जाणकार वाचकांची इथला असते. वर्तमानपत्रे बातम्यांशिवाय इतरही अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवीत असतात. कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला नोकर पाहिजेत हेही वर्तमानपत्रे सांगतात. वधूवरांच्या अपेक्षा वर्तमानपत्रांतून सुचवलेल्या असतात. जाहिराती हा तर वर्तमानपत्र व्यापून टाकणारा मोठा भाग. कुठे काय मिळेल, कुठे सेल लागला आहे, कोणत्या नव्या गोष्टी बाजारात आल्या आहेत बांच्या अनेक रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती वृत्तपत्रांत झळकत असतात. नाटक, चित्रपट बांबद्दलची रोजची हकिकत वृत्तपत्रे देत असतात. वर्तमानपत्रे बंद झाली, तर या सर्व गोष्टी सामान्य माणसांपर्यंत कशा पोहोचणार ?

वर्तमानपत्रे वेळोवेळी पुरवण्या काढत असतात. त्यांत चित्रपट नाटकांची परीक्षणे आलेली असतात. बहुतेकजण ही परीक्षणे वाचून चित्रपट नाटक पाहायचे की नाही, हे ठरवतात. या पुरवण्यांत साहित्याशी संबंधित अशी सदरे असतात. त्यावरून कोणते पुस्तक वाचायचे, कोणता ग्रंथ खरेदी करायचा यांबद्दल निर्णय घेता येतो. वर्तमानपत्र आपल्याला रोजचे पंचांग म्हणजे कोणती तिथी, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त यांबद्दल ज्याप्रमाणे माहिती देते, त्याप्रमाणे आपल्या राशींचे भविष्यही आपल्याला सांगते. सोन्याचांदीचे भाव, लॉटरीचे निकाल, पौंड डॉलर यांच्या रुपयातील किमती यांबाबतच्या बातम्या वृत्तपत्र घरबसल्या देतात. वृत्तपत्रे बंद झाली तर मग अनेकांची गैरसोय होईल.

समाजात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वादळ उठत असते. मग लोकशाही राज्यात लोकांना आपली मते मांडायची असतात. वृत्तपत्र त्यांना उत्तम व्यासपीठ देते. जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारत पराभूत झाला, तेव्हा भारतीयांच्या भावना भडकून उठल्या. मग वृत्तपत्रांतून पानेच्या पाने भरून जनमानस व्यक्त होऊ लागले. ‘जनमनाचा कानोसा’, ‘लोकमानस’, ‘वाचकांची पत्रे’ हे वृत्तपत्रांतील सदरे नेहमी अगदी जिवंत आणि झणझणीत असतात.

अलीकडे वृत्तपत्रांतून विद्यार्थ्यांचा अभ्यासही घेतला जातो. पुढील जीवनात कोणती शाखा निवडावी, कोणता अभ्यास करावा, यांबाबतही वृत्तपत्रे मार्गदर्शन करू लागली आहेत. अशी ही वर्तमानपत्रे समाजजीवनात चैतन्य निर्माण करतात. यशस्वी समाजाच्या नाड्या त्यांच्या हातात असतात. मग बंद पडून कसे चालणार ?

चित्रपट बंद केले तर…

माझी परीक्षा चालू होती. उदया गणिताचा पेपर होता आणि नेमका आज एक गाजलेल चित्रपट दूरचित्रवाणीवर दाखवला जात होता. आई सोडून घरातील सर्वजण चित्रपट बघण्यात दे होते. आई मात्र छोट्या विनयचा अभ्यास घेत बसली होती. आईला घरातल्या सर्वांचा आছि चित्रपटाचा राग आला होता. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले- “खरोखर, हे चित्रपट बंद केले तर किती बरे होईल!”

खरोखर मलाही कधी कधी वाटते की, हे चित्रपट बंदच झाले पाहिजेत. माणसे, विशेषतः सर्व तरुण चित्रपटांच्या भुलभुलैयात हरवतात. चित्रपटांतील रंगीबेरंगी स्वप्निल दुनिया त्यांना खरी वाटते. हीच दुनिया ते वास्तवात शोधू लागतात आणि त्यांचा भ्रमनिरास होतो. त्यांना जीवनाबद्दल वैफल्य वाटू लागते. आत्महत्येसारख्या भीषण घटना घडतात.

अनेकदा चित्रपट निर्मात चित्रपटाकडे धंदा म्हणून पाहतात. चित्रपट हा विकाऊ माल बनतो. भरपूर पैसा मिळवण्यासाठी तो भडक बनवला जातो. व्यसनाधीनता, लैंगिकता, हिंसा असल्या विकृत प्रवृत्तींनी चित्रपट बरबटवला जातो. या सगळ्यांचा प्रेक्षकांच्या मनावर परिणाम होतोच. प्रेक्षक या प्रवृत्तींच्या आहारी जातो किंवा या प्रवृत्तींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन निबर बनत जातो. समाजाला हे घातक आहे. म्हणून चित्रपट बंद झालेच पाहिजेत.

पण… पण… चित्रपट खरोखरच बंद झाले तर…? पहिला परिणाम दूरदर्शन वाहिन्यांवर होईल. आजकाल कोणतीही वाहिनी पाहिली, तर त्या वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम चित्रपटांवरचा असतो. काही वाहिन्या तर चित्रपट नसतील, तर बंदच पडतील, पण त्या वाहिन्यांचे राहू दया, मनोरंजनाचा केवढा मोठा खजिना चित्रपटांमुळे उपलब्ध होतो, तो सर्व बाद होईल. लोक मनोरंजनाला पूर्णपणे मुकले नाहीत, तरी मनोरंजनाचे फार मोठे क्षेत्र नाहीसे होईल. साधे पाहा… सहलीत गेलेल्यांना सहलीत कोणती गाणी म्हणायची, हा प्रश्न पडेल.

गाण्याच्या भेंड्यासारख्या साध्या साध्या आनंदाला मुकावे लागेल.

चित्रपट बंद केले, तर मोठमोठी चित्रपटगृहे ओस पडतील. चित्रपटांमुळे उपजीविकेचो खूप साधने उपलब्ध होतात. निमति, दिग्दर्शक, नट, गायक यांना पैसे मिळतातच; वादक, दुय्यम कलाकार, लहानमोठे तंत्रज्ञ, विविध प्रकारच्या वस्तू तयार करणारे, त्यांचा पुरवठा करणारे, जाहिरातदार, चित्रपटगृहे, तेथील कर्मचारी, अवतीभोवतीचे विक्रेते… ही यादी खूपच वाढू शकेल. या साऱ्यांचा उदरनिर्वाह चित्रपटांवर अवलंबून असतो. चित्रपट बंद झाले, तर हे सर्व उपाशी राहतील आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांवरही उपासमारीची पाळी येईल.

चित्रपटांचा एक चांगला परिणाम नेहमी दुर्लक्षिला जातो. चित्रपटांचे चित्रीकरण जगभरातील विविध ठिकाणी केले जाते. त्यामुळे जगाचे दर्शनच आपल्याला घडते, तिथला परिसर, तिथली माणसे, त्यांची जगण्याची रीत, त्यांची सुख दुःखे हे सारे चित्रपटांतून आपल्यापुढे येते. चित्रपट बंद झाले, तर माणसाचे हे विविध दर्शन घडणारच नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किती सहजगत्या सर्वसामान्यांपर्यंत चित्रपटांमुळे पोहोचले ! चित्रपट नसतील, तर हे मार्ग बंद होतील.

व्ही. शांताराम, सत्यजित राय यांसारख्या दिग्दर्शकांनी सर्वसामान्यांचे फार मोठे प्रबोधन केले. लोकांच्या जाणिवा प्रगल्भ केल्या. हे सर्व अशक्य होईल.

तेव्हा चित्रपट बंद करणे, हा उपाय होऊ शकत नाही; तर चित्रपटाविषयीची दृष्टीच अधिकाधिक निकोप केली पाहिजे. मात्र, चित्रपट बंद करू नयेत.

मी शिक्षक झालो तर…

आम्ही दहावीत आलो तेव्हा आमच्या शाळेने एका प्रकल्पात भाग घेतला होता. प्रकल्प एका संस्थेने सुरू केला होता. ‘शाळा तुमच्या दारी.’ आदिवासी वस्तीत जाऊन तेथील मुलांना शिकवायचे. आम्हीपण आमच्या सरांबरोबर आठ दिवस तेथे गेलो होतो. त्या मुलांना शिकवताना मला खूप गंमत वाटली. मी त्यांना काही कविता शिकवल्या आणि नंतर कातरकाम करून कागदांतून काही आकृती बनवायला (ओरीगामी) शिकवल्या. प्रथम थोडा वेळ लागला; पण नंतर त्यांना भराभरा जमू लागले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता. तेव्हाच माझ्या मनाने निर्णय घेतला की, आपण शिक्षक व्हायचे !

आपल्या संस्कृतीत तीन प्रकारची ऋणे सांगितली आहेत. त्यांपैकी एक आहे ‘ऋषिऋण’ म्हणजे गुरूचे ऋण. गुरूचे ऋण कसे फेडायचे ? तर गुरूकडून आपल्याला जे काही ज्ञान मिळाले, विद्या मिळाली ती आपण दुसऱ्याला दयायची. मी शिक्षक झालो, तर मी माझ्या गुरुजींच्या ऋणांतून काही अंशांनी तरी मुक्त होऊ शकेन.

मी शिक्षक झालो तर…? याबाबत जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा माझे अनेक शिक्षक माझ्या मनःचक्षुसमोर उभे राहतात. मला आठवतात माझ्या पूर्वप्राथमिक शाळेतील ‘ताई’. त्या किती धडपडत असत. आम्हांला गाणी, गोष्टी शिकवत. आम्ही कितीही दंगा केला तरी त्या आमच्यावर कधी रागावत नसत. नंतर प्राथमिक व माध्यमिक शाळेत आमच्यासाठी कष्ट घेणारे शिक्षक आठवले. आमचे हस्ताक्षर चांगले व्हावे, आम्हांला
बावनाची गोडी लागावी, आमच्यात सभाधीटपणा यावा, म्हणून सतत धडपडणारे शिथ आठवले. इंग्रजी भाषेत आपण बिनचूक, अस्खलित बोलावे, म्हणून धडपडणारे सर, गणित आम्ही प्रवीण व्हावे, म्हणून झटणारे गुरुजी डोळ्यासमोर आले. साने गुरुजी, लोकमार टिळक, प्राचार्य गोपाळराव आगरकर या आदर्श शिक्षकांविषयीच्या वाचलेल्या हकिकत आठवल्या.

मी शिक्षक झालो तर आदर्श शिक्षक होण्याचाच यत्न करीन. त्यासाठी मी माइश विषयांत निपुण होईन, शिक्षक हा सदैव विद्यार्थी असला पाहिजे. त्याने सदैव आपल्या विषयाने अध्ययन केले पाहिजे. काही शिक्षक खूप हुशार असतात, तज्ज्ञ असतात. पण ते विदयाथ्यां पर्यंत आपले ज्ञान नीट पोहोचवू शकत नाहीत. मी शिक्षक झालो, तर मी माझा विषय विद‌यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवीन. शिकणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टींत रम निर्माण झाला पाहिजे. आपला विषय विद्यार्थ्यांना ‘ बोअर’ होणार नाही याची शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे. किंबहुना हसतखेळत अध्यापन हे कसब मी साध्य करून घेईन. वर्गातील हुशार विद्यार्थ्याला जेवढी गोडी वाटेल, तेवढीच गोडी वर्गातील सुमार विद्यार्थ्याला वाटली पाहिजे, तरच मी यशस्वी शिक्षक ठरेन, मला केवळ विषय शिकवायचा नाही, तर माझ्यासमोरच्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व मला घडवायचे असेल. तेच माझे ध्येय असेल.

मी मुख्याध्यापक झालो तर…

शाळेतील विदयार्थी दिन जवळ येत चालला होता. एका दिवसासाठी शाळेचा संपूर्ण कारभार आम्ही विदयार्थी सांभाळणार होतो. सगळे दोस्त मला आग्रह करत होते की, मीच मुख्याध्यापक म्हणून काम करावे. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, एक दिवसाचा मुख्याध्यापक होण्याऐवजी मी कायमचा मुख्याध्यापक झालो, तर…?

मी मुख्याध्यापक झालो तर मी माझी शाळा आदर्श करण्याचा कसोशीने प्रयत्न करीन. विदयार्थी, शिक्षक व पालक या प्रमुख घटकांच्या सहकार्यातून शाळेचा दैनंदिन कारभार चालत असतो. या तीनही घटकांत समन्वय घडवून आणण्याचे काम मुख्याध्यापक म्हणून प्रथमतः मी करीन.

माझ्या सर्व विदयार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी, प्रेम वाटेल असेच वातावरण मी माझ्या शाळेत ठेवीन. ही शाळा माझी आहे व मी शाळेचा आहे, असेच माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाटावे, यासाठी मी अथक प्रयत्न करीन, त्या विद्यार्थ्यांना विदद्यादान बोग्य प्रकारे करण्यासाठी शक्य तेवढ्या सर्व सोयी मी माझ्या शाळेत करीन. शालेय विषय शिकताना ते आकर्षक वाटतील व त्यांत विद्यार्थ्यांना कुतूहल वाटेल, अशा प्रकारची सर्व साधने भो शाळेत आणून ठेवीन. शालेय विषयांव्यतिरिक्त सहशालेय उपक्रमांतही माझ्या शाळेतील विदद्यार्थ्यांना योग्य संधी मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, याची मी स्वतः जातीने काळजी वाहीन, त्यासाठी मी माझ्या शाळेसाठी प्रशस्त इमारत व विस्तीर्ण क्रोडांगण मिळवीन.

शाळेचे आधारस्तंभ म्हणजे शाळेतील शिक्षक, शाळेतील कोणताही उपक्रम मी या माझ्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय व सहकार्याशिवाय करणार नाही. शिवाय माझ्या या शिक्षकांच्या अडचणींच्या वेळी मी स्वतः त्यांच्या पाठीशी राहीन. अशा खेळीमेळीच्या वातावरणात मी, माझे शिक्षक आणि माझे विद्यार्थी यांत एकसूत्रता राखण्याचा प्रयत्न करीन.

विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेविषयी आपुलकी वाटली की, शाळेच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांची मदत होऊ शकते. त्यांना शाळा आपली वाटावी म्हणून मी त्योना वेळोवेळी शाळेत बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय करीन, पालक मेळावे भरवून त्यांच्या- अडचणी समजावून घेईन व त्या दूर करण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करीन.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *