Essay In Marathi For 10th Standard | दहावीसाठी मराठी मध्ये निबंध

By vedu Feb 2, 2024
Essay In Marathi For 10th Standard

कथनात्मक निबंध

Essay In Marathi For 10th Standard दिवसागणिक कित्येक घटना आपल्याभोवती घडत असतात आणि त्या आपण इतरांना रंगवून सांगत असतो. तेच स्वरूप कथनात्मक निबंधाचे असते. या प्रकारच्या निबंधातील कथन आकर्षक हवे. वाचणाऱ्यांची उत्सुकता सतत वाढत राहिली पाहिजे.

कथनात्मक निबंध लिहिताना योग्य प्रसंगांची निवड करावी लागते. कथन करताना घटनांचा क्रम बरोबर असावा, शिवाय आपण जे कथन करणार आहोत ते एवढे उठावदार हवे की कथन केलेली घटना वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली पाहिजे.

एखादया व्यक्तीचे चित्र रेखाटले असेल तर त्या व्यक्तीचे सर्व विशेष विविध घटनांतून वाचकांसमोर उभे राहिले पाहिजे.

Essay In Marathi For 10th Standard | दहावीसाठी मराठी मध्ये निबंध

आमच्या घरी चोरी झाली, तेव्हा…

चार दिवसांची महाबळेश्वरची सहल आटोपून आम्ही घरी आलो. घराचे दार उघडल्यावर घराचा व्हरांडा रिकामा दिसला. येथील खुर्चा कुठे उचलून ठेवल्या? असा प्रश्न मनात आला.

व्हरांड्यातून दिवाणखान्यात आलो तर टी. व्ही., व्हिडियो, व्ही. सी. आर्. सर्व सामान अदृश्य झाले होते. पुढे गेलो तर कपाटेही रिकामी होती. गोदरेजच्या कपाटातील ‘सेफ’ फोडून सोनेनाणे, चांदीची भांडी, रोकड रक्कम सारं काही लंपास केले गेले होते. सेफमधील महत्त्वाचे कागद इकडेतिकडे पसरलेले होते.

एव्हाना आई स्वयंपाकघरात जाऊन पोचली, स्वयंपाकघरातील अनेक भांडी, डबे अदृश्य झाले होते. चोरांनी डबे चोरून नेताना त्यांतील वस्तू खाली कागदावर आणि जमिनीवर ओतल्या होत्या. हे पाहून आमच्या घरात मोठी चोरी झाली असल्याचे आमच्या लक्षात आले.

दादाने सर्वांना बजावले की, कोणीही कशाला हात लावू नका, सर्वांनाच फार मोठा धक्का बसला होता. चार दिवस मजा करण्यास गेलो, तर असा हा मोठा फटका बसला होता. मुख्य म्हणजे आमच्या टॉमीला आम्ही आपल्याबरोबर नेले होते, ही मोठी चूक झाली होती. टॉमी घरातली प्रत्येक वस्तू हुंगत होता.

बाबांनी पोलिसांना कळवले होते. त्यामुळे थोड्याच वेळात पोलीस आपल्या ‘सिझर’. कुत्र्यासह घरी येऊन पोचले. आल्या आल्या सिझरने सर्व वस्तू हुंगल्या आणि आला तसाच तो मागे फिरून पळू लागला. त्याच्याबरोबरचे पोलिसही निघाले. सिझर पळत पळत माळाकडे गेला आणि तेथे जाऊन थांबला. कारण माळ रिकामा होता. गेले काही दिवस तेथे काही भटक्या लोकांचा मुक्काम होता. ते तेथून निघून गेले होते. चोर मिळाले नाहीत, पण चोरी कोणी केली ते पोलिसांनी आता ताडले होते.

पोलिसांची सर्व पाहणी झाल्यावर आम्ही सर्व घर धुऊन काढले व घर लावायला लागलो. आणखी काय काय चोरीला गेले हे शोधत होतो. एवढे सर्व सामान चोरांनी केव्हा आणि कसे नेले असेल कळत नव्हते. तेवढ्यात आमच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणारे एक गृहस्थ तेथे आले. त्यांनी आम्हाला पाहून आश्चयनि विचारले, “अरे तुम्ही मंडळी येथे कशी ? तुमची बदली दिल्लीला झाली होती ना?” त्यांचा हा प्रश्न ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो. तेव्हा ते पुढे म्हणाले, “गेल्या आठवड्यात काही माणसे तुमच्या घरातील सामान एका ट्रकमध्ये चढवत होती. सहज त्यांच्याजवळ चौकशी केली, तेव्हा तुमची बदली झाल्याचे त्यांच्याकडून कळले.” चोरी कशी झाली ते आता कळले होते, म्हणजे, आमच्या घरी चोरी करणारे चोर एकंदरीत बरेच चतुर होते ।

अशी झाली माझी फजिती

आपल्या स्मरणशक्तीचा मला फार मोठा अभिमान होता. तसा मला माझ्या जवळच्या प्रत्येक गोष्टीचा अवास्तव अभिमान म्हणजे अहंकारच होता म्हणा ना! मी छान दिसते, छान काम करते, छान गाते, अभिनयही मी चांगला करते असे सर्वजण म्हणतात. त्यामुळे माझ्या डोक्यात थोडी हवा जास्तच गेली होती,

यंदा शाळेच्या स्नेहसंमेलनात शिक्षिकांनी एक नाटक करायचे ठरवले. त्यात एका लहान मुलीची भूमिका आशीर्वाद’ नावाच्या नाटकातील ती मुलगी अगदी चुणचुणीत होती, स्वाभाविकच सर्व शिक्षिकांनी एकमताने माझी निवड केली. आपल्याला हा मान मिळाला, म्हणून मी गवनि हवेत तरंगत होते.

स्नेहसंमेलनाच्या इतरही अनेक कार्यक्रमांत भी भाग घेतलेला असल्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी सरावासाठी जावे लागले. स्वाभाविकच नाटकाच्या तालमींना मी वेळ देऊ शकत नव्हते. अगदी रंगीत तालमीच्या वेळीही माझे सर्व संवाद पाठ नव्हते. तेव्हा मुख्याध्यापिका मला म्हणाल्याही, “अगं, तुझे पाठांतर कसे होणार?” पण तेव्हाही मोठ्या अभिमानाने खाद उडवत मी त्यांना सांगितले, “होईल बघा माझं पाठ, आहे काय त्यात!”

नाटकाचा दिवस उजाडला, सर्वांची वेषभूषा झाली. मी मोठ्या आत्मविश्वासाने काम करणार होते. रंगमंचावर मी प्रवेश केला. दोन-चार वाक्ये बोलले आणि मग मला पुढचे काही आठवेच ना! माझ्या समोरच्या बाईंच्या हे लक्षात आले. त्यांनी मला थोडी सूचना दिली आणि कसेबसे सांभाळून घेतले. पुढचे सगळे नाटक मो प्रॉस्टिंगवर भागवून नेले. नाटक पार पडले, पण माझी भूमिका मात्र पार पडली आणि मुख्य म्हणजे मी माझे संवाद विसरले, हे सर्वांच्या लक्षात आले. सर्व शिक्षिकाही माझ्यावर नाराज झाल्या. जादा आत्मविश्वासाने, अहंभावाने माझी अशी फजिती झाली.

एक रंगलेला सामना

कसोटी मालिका आणि एक दिवसीय क्रिकेट सामने आम्ही पाहतो ते दूरचित्रवाणीवर, आमच्या गावात असे सामने कसे होणार? पण बाहेर असे सामने सुरू झाले की गावातील मुलांनाही सामन्याची स्फूर्ती होते. असाच तो एक सामना रंगला होता.

सामना होता आमच्या शाळेचा म्हणजे आदर्श प्रशालेचा न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांशी. एक दिवसाचा सामना होता. खरं पाहता ते सर्व आमचे मित्रच होते. कित्येक वेळा आम्ही एकत्र खेळलो होतो. पण आज मात्र आम्ही एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे होतो.

सामन्याच्या सुरवातीला शकुन झाला. आज आमच्या कप्तानाने नाणेफेक जिंकली. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. आमच्या शाळेतील गोलंदाजाबद्दल आम्हांला खात्री होती. त्यामुळे सामन्याला मोठ्या उत्साहाने सुरवात झाली. आमच्या गोलंदाजांनी कामगिरी मोठ्या जबाबदारीने पार पाडली. प्रतिस्पर्धी संघातील पहिले चार खेळाडू लवकर बाद झाले. आमच्या शाळेतील विदयार्थ्यांनी नुसता जल्लोष चालवला होता. न्यू इंग्लिश स्कूलचे विदयार्थी मात्र गप्पच होते.

पाचव्या आणि सहाव्या खेळाडूंची जोडी मात्र जमली. धावांचा आकडा सतत वाढत होता. गोलंदाज परोपरीने प्रयत्न करत होते, पण ती जोडी फुटण्याचे लक्षण दिसत नव्हते. आता आमच्या शाळेतील विदयार्थी गप्प होते आणि न्यू इंग्लिश स्कूलची मुले आनंदात ओरडत होती. कशीबशी त्यांच्यासाठी ठरवलेली षटके संपली, पण धावांचा आकडा बराच फुगला होता.

आता आमचा संघ खेळायला उतरला. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे? आमचे सलामी वीर अपेक्षेपेक्षा लवकर बाद झाले. धावांची संख्या फारच कमी होती. अतिशय दडपण निर्माण झाले होते. पण आमचा कप्तान मात्र मोठ्या धैर्याने आणि जबाबदारीने खेळत होता. त्याला साथ देणारे एक-दोघे बाद झाले. अजून वीस-पंचवीस धावांचे अंतर होते. सामना कोण जिंकणार? याबद्दल सर्वजण साशंक होते. दोन-तीन धावांनी आम्ही सामना हरणार असे वाटत होते. तीन धावा कमी होत्या आणि शेवटचा एक चेंडूच राहिला होता. श्वास रोखून सर्वजण सामना पाहत होते. गोलंदाजाने शेवटचा चेंडू टाकला आणि कप्तानाने जो टोला उंचावला तो मैदानाच्या पार पलीकडे पडला. शेवटच्या त्या षट्काराने आम्हांला विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यातील ‘सामनावीर’ होता आमच्या शाळेचा कप्तान.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *