Essay In Marathi For Class 7

By vedu Feb 3, 2024
Essay In Marathi For Class 7

आज आपण पाहणार आहोत माझा आवडता मित्र, माझे प्रिय शिक्षक, माझी धाकटे बहीण या विषयावर आज आपण निबंध पाहणार आहोत अधिक माहितीसाठी व दुसऱ्या निबंध आपला मराठी वारसा ब्लॉक पहावा.

Essay In Marathi For Class 7

माझा आवडता मित्र

मंगेश माझा अगदी बालवाडीपासूनचा मित्र. आई सांगते की, बालवाडीतील त्या वर्गात आम्ही जोडीने दाखल झालो आणि तेव्हापासनूच आमची गट्टी झाली. पुढे प्राथमिक शाळेतील चार वर्षे आम्ही एकाच बाकावर बसत असू आणि परीक्षेतील पहिला दुसरा क्रमांकही आम्ही आलटून पालटून घेत होतो.

आता माध्यमिक शाळेतही मंगेशचा व माझा एकच वर्ग आहे. त्यामुळे आमच्या मैत्रीत कुठेही खंड पडलेला नाही. खरं पाहता, आमच्या आवडीनिवडी क्याच वेगळ्या आहेत. तरी त्या आमच्या मैत्रीच्या आड येत नाहीत.

चित्रकला हा माझा आवडीचा विषय आहे. तासन्तास मी त्यात रंगून जातो. मंगेशला • मात्र चित्रकलेचे वावडे आहे. त्यामुळे चित्रकलेच्या वाट्याला तो जात नाही. त्याऐवजी तासन्तास पाण्यात डुंबणे त्याला पसंत आहे. पोहण्याच्या स्पर्धेत मंगेश उतरला की सगळी बक्षिसे मंगेशच पटकवणार हे ठरलेले असते. कधीतरी इंग्लिश खाडी पोहून जायचे हो त्याची महत्त्वाकांक्षा त्याने मला सांगितली आहे.

मंगेशचे मन मोठे आहे. इतक्या वर्षात मंगेशचे कुणाशी भांडण झालेले मी ऐकले नाही. उलट कुणाचे भांडण झाले की मंगेश मध्ये पडून ते सोडवतो. त्यामुळे मंगेश माझा खास मित्र आहे, पण तित्काच तो वर्गातही सर्वांचा आवडता आहे. शिक्षकही त्याच्यावर नेहमी खूष असतात.

मंगेशच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे. मला स्वतःला वाटत नाही, इतका अभिमान मंगेशला माझ्याविषयी आहे. माझी चित्रे, माझे हस्ताक्षर, मला मिळणारी बक्षिसे खुवर तो विलक्षण प्रेम करतो. आणि आपला मित्र इतका हुषार आहे, यावरच स्वारी खूश असते.

माझे आवडते शिक्षक

प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळेत आलो तेव्हा थोडा धास्तावलेलाच होतो. पण पहिल्याच दिवशी माझी भीती पळून गेली. त्याचे श्रेय जाते ते सावंत सरांकडे. सरांनी

आपल्या मधुर वाणीने आम्हांला जिंकले होते. त्यामुळेच शाळा आम्हांला फार प्रिय झाली. सावंत सर आम्हांला मराठी शिकवतात ते आमचे वर्गशिक्षकही आहेत. सरांमुळे मला हा विषय फार प्रिय झाला.

आजही सर वर्गात शिकवतात, तेव्हा सारा वर्ग त्यांच्या शिकवण्यात रंगून जातो. त्यावेळी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भोवतालच्या साऱ्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. कितीही अवघड कविता असली तरी सर ती अगदी सुलभ करून, रंगवून सांगतात. मराठी साहित्याचा सरांचा अभ्यास खूप चांगला आहे आणि आपल्या विदयार्थ्यांची किती तयारी आहे, याचीही त्यांना योग्य कल्पना आहे.

मला आठवतंय, आम्ही पाचवीत असताना सरांनी आम्हांला ‘आई’ ही कविता शिकवली होती. त्यावेळी आम्ही सर्वजण एकदम भारावून गेलो होतो. एक शब्दही कोणी उच्चारला नाही. शब्दांचे सामर्थ्य एवढे असते, हे मला त्या दिवशी प्रथम जाणवले. नंतर मराठीच्या प्रत्येक तासाला आम्हाला काही ना काही नवीन ज्ञान मिळत असे. आठवड्याच्या तासातील एक तास ते अवांतर वाचनासाठी ठेवत. त्या तासाचा उपयोग करून सरांनी आम्हांला अनेक चांगली पुस्तके वाचून दाखवली. सरांनी केलेले पुस्तकांचे वाचन एवढे भावस्पर्शी होते की, सारा वर्ग त्यात गुंगून जायचा. या सामुदायिक वाचनामुळे आम्हांला वाचनाचा छंद लागला.

सरांचे हस्ताक्षर उत्तम आहे. त्यांनी फळ्यावर लिहिलेला मजकूर पुसूच नये असे वाटते. आमचे हस्ताक्षरही वळणदार व्हावे म्हणून ते कसून प्रयत्न करतात, प्रसंगी कठोरही होतात.

सरांची साधी राहणी, प्रेमळ वृत्ती आणि स्वीकारलेले काम चोख करण्याचा स्वभाव या गोष्टींनी मला अतिशय आकर्षित केले आहे. त्यामुळे सर आणि मराठी विषय हे दोन्हीही माझे विशेष लाडके झाले आहेत.

माझी धाकटी बहीण

माझी धाकटी बहीण ‘जुई’ ही माझ्याहून पाच वर्षांनी लहान आहे. म्हणजे मी आता सातवीत आहे आणि ती तिसरीत आहे. त्यामुळे अनेक वेळा मला तिच्यावर ताईगिरी करता येते, पण एवढ्याशा जुईला ते सहन होत नाही. मग मोठा आजीबाईंचा आव आणून कुठंतरी : ऐकलेले बोल ती सहजगत्या बोलून जाते, “नकटं व्हावं गं बाई, पण धाकटं होऊ नये.”

जुई तिच्या वयाच्या मानाने खूपच हुशार आणि चुणचुणीत आहे. कोणतीही गोष्ट तिला स्वतः करून पाहण्याची मोठी घाई झालेली असते. मग काही वेळेला ती त्यातून स्वतःवर संकटे ओढवून घेते. कुणाच्याही नकळत स्वतःच्या गणवेषाला इस्त्री करण्याच्या प्रयत्नात तिने गणवेष जाळून घेतला. भाजणे, पडणे या साऱ्या गोष्टी तिच्या बाबतीत नित्याच्याच झाल्या आहेत. पण बहुतेक वेळा ती स्वतःच जखमेवर डेटॉल, मलमपट्टी लावून मोकळी झालेली असते. या तिच्या पराक्रमांपुढे आई हतबल होते आणि म्हणते, “पुरे बाई, हा. तुझा मीपणा. एखादया दिवशी मोठं संकट ओढवून घेशील. तेव्हा कळेल.” वैतागली की आई एखादया दिवशी म्हणते, ” अग, तू मुलगा तरी झाली असतीस तर बरं झालं असतं !”

मुलगा होण्यामुळे कोणता फरक होणार होता, हे जुईला कळतच नाही. कारण तिच्या मते तिचे वागणे हे वांडपणाचे नाहीच मुळी. अभ्यासातही तिची गती चांगली आहे. त्यामुळे थोडा अभ्यास करून देखील ती उत्तम गुण मिळवते.

जुई ही जुईच्या फुलासारखीच नाजूक आणि सुंदर दिसते. खरं तर जुई चांगलीच काटक आहे. गिर्यारोहणाच्या वेळी तिचा हा काटकपणा लक्षात येतो. स्वतःची हुशारी, काटकपणा यांची तिला जाणीव आहे. म्हणून तर चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत ताईचे रेकॉर्ड आणि शालान्त परीक्षेत बाबांचे रेकॉर्ड मोडण्याचा तिचा निश्चय आहे. जुईची घरातील खरी विरोधक आई असली तरी जुईचे सर्वांत अधिक प्रेम आईवर आहे. त्यामुळे आईने चांगले म्हटले की, तिला धन्य वाटते.

आपल्या ताईचाही तिला रास्त अभिमान आहे. ज्यावेळी ती आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये गप्पा मारत असते, तेव्हा आपल्या ताईविषयीचा तिचा अभिमान शब्दांशब्दांतून व्यक्त होत असतो. अशी ही जुई म्हणजे आमच्या घरातील आनंदाचा अमोल ठेवा आहे जणू!

माझी कर्तबगार आई

आई

बाईंनी आईवर निबंध लिहायला सांगितला तेव्हाच मी माझ्या मनाने त्या विषयात थोडासा बदल केला. माझ्या निबंधाचा विषय असेल, ‘माझी कर्तबगार आई’ कारण ‘कर्तबगार’ या एकाच शब्दात माझ्या आईचे पूर्ण चित्र उभे राहते.

माझी आई द्विपदवीधर आहे; पण ती नोकरी वा व्यवसाय करत नाही. आपले कर्तव्यक्षेत्र तिने अचूक जाणले आहे. माझ्या बाबांना नोकरीनिमित्त वरचेवर परदेशात जावे लागते. महिनोन्महिने ते घरापासून दूर असतात. अशा वेळी आमची आई हीच आमची- माझी व मुन्नाची- आई व बाबा असते. त्याचबरोबर माझे वृद्ध आजी-आजोबा यांचाही ती मोठ्या प्रेमाने सांभाळ करते.

बाबा परदेशात असताना एकदा माझे आजोबा खूप आजारी झाले. पण आईने हातपाय गाळले नाहीत. तिने त्यांना रुग्णालयात नेले. त्यांची योग्य काळजी घेतली आणि ते चांगले बरे झाल्यावरच तिने बाबांना सर्व कळवले. उगाच लांबच्या माणसाला काळजी नको, असा आईचा विचार:

मी आणि मुन्ना यांच्याबाबत आई कोणतीही गोष्ट चुकवत नाही. आमचा अभ्यास, आमचा व्यायाम, आमचं खाणपिणं याबाबत ती वेळोवेळी कठोरही होत असते. पण तितकेच ती आमचे लाडही करते. सर्कस, प्रदर्शन, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, तारांगण या साऱ्या ठिकाणी ती आम्हांला घेऊन जाते. आमच्याबरोबर आमचे काही मित्रही अशा सहलीत होतात.

आमच्या इमारतीत कोणाची काही अडचण उभी राहिली तरी आई त्यांच्या मदतीला धावून जाते. मध्यंतरी शहरात दंगल उसळली होती. त्यामुळे आमच्या वसाहतीत घबराट उडाली. पण आमची आई बिलकूल डगमगली नाही. तेव्हाही आईने पुढाकार घेऊन सर्वांना धीर दिला आणि रात्रीच्या वेळी वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी काही योजनाही आखल्या.

मग सांगा बरं, आहे की नाही माझी आई कर्तबगार !

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *